लवकर कीर्तन शिकण्याचा रामबाण उपाय
- ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)
वर्ष उलटले तरी काही विद्यार्थ्यांना अजून कीर्तनाचा अभ्यास पूर्ण करता आला नाही.
त्यांच्यासाठी येथे काही गोष्टी देत आहोत.
कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.
1. त्या गोष्टीसाठी दररोज वेळ दिला पाहिजे.
अ. नियमितपणा
एखादी गोष्ट नियमितपणे करण्याची सवय हवी. आज झाली नाही, तर उदया करू ही
सवय घातक आहे. नियमितपणा नसल्यामुळे त्या गोष्टीचे विस्मरण होते. आपण किती दिवस या
गोष्टीचा विचारही केला नाही हेसुध्दा आठवत नाही.
आ. सातत्य
सातत्यामुळे त्याच त्याच गोष्टी पुन्हा शिकाव्या लागत नाहीत. आधीच गोष्टी शिकून
होतात व नव्या गोष्टीकडे वळता येते. अन्यथा जुन्या गोष्टी विसरून गेल्यामुळे त्याच
शिकाव्या लागतात आणि विस्मरण चक्र सुरू राहते.
2. ती गोष्ट शिकण्याचा कालबध्द कार्यक्रम केला पाहिजे.
मी एक वर्षभरात कीर्तन शिकणार हे ठरविल्यावर, बारा महिन्यांचे नियोजन करायला हवे.
प्रत्येक महिन्यात आपला किती भाग शिकून होणार आहे ते ठरवायला हवे. जर नागपूरहून नाशिकला
महिन्याभरात चालत जायचे असेल तर प्रत्येक दिवसात किती अंतर कापावे लागेल ते ठरवायला
हवे. त्यानुसार प्रत्येक दिवशी प्रवास करायला हवा. अन्यथा आपण जेथे आहोत तेथेच असू.
3. ती गोष्ट शिकण्याची पध्दत ठरविली पाहिजे.
ही गोष्ट आपण नेमकी कशी शिकणार आहोत, ते ठरविले पाहिजे. यात वाचन, लेखन आणि पाठांतर या गोष्टी येतात. काय आणि किती वाचणार? काय आणि किती लिहिणार? काय आणि किती पाठांतर करणार?
याचा विचार करणे आवश्यक आहे.
अभ्यास कसा करावा? या विभागात या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन केले आहे. ते नीट काळजीपूर्वक
वाचायला हवे.
4. सराव - गायन आणि वादन हे सरावाशिवाय अशक्य आहे. विराट कोहलीने
सराव केला नाही तर त्याला शून्यावरच समाधान मानावे लागणार. झांजेचे वादन, पेटीवादन आणि अभंगगायन याला नियमित सरावाची गरज आहे. या गोष्टी सहज करायच्या
गोष्टी आहेत. त्या सरावानेच येतात. सराव न
करता या गोष्टी येतील अशी गैरसमजून करून घेऊ नये.
5. आपल्या मार्गदर्शकांना आपली अडचण वेळेवर सांगून ती सोडवून घेणे
आवश्यक असते.
No comments:
Post a Comment