माणसाला बोलण्याचे वेड असते. प्रत्येक जण हा काहीबाही कोणालाही सांगत असतो. आपण संभाषण नेहमीच करीत असतो. कीर्तनकला हा भाषणाचा प्रकार आहे. बोलक्या माणसाला नीट व व्यवस्थित बोलायला शिकविणे, नीट बोलणाऱ्या माणसाला प्रभावी भाषण करण्यास शिकविणे आणि प्रभावी भाषण करणाऱ्याला उत्तम कीर्तन करायला शिकविणे असे कीर्तनकलेचे तीन चरण आहेत. एक - वर्गात शिकविलेले कीर्तन जसेच्या तसे बिनचूक म्हणून दाखविणे. दोन- आपण जे काही सांगत आहोत ते जणू काही आपल्याच पदरचे आहे व आपणच ते सिध्द केले आहे अशा आविर्भावात सांगणे. तीन - खरोखर आपल्या पदरचे म्हणजे आपण अनुभवसिध्द केलेले ज्ञान लोकांना सांगणे. प्रत्येक कीर्तनकाराने हा तिसरा टप्पा गाठला पाहिजे. लोकांना सांगण्याजोगे आपल्या पदरात बांधून घेण्याचा सतत उपक्रम चालविला पाहिजे. केवळ पोपटपंचीने उत्तम कीर्तनकार घडत नाही. कीर्तनकाराला जीवन जगण्याची कला लोकांना शिकविता आली नाही तर त्याचे प्रबोधन व्यर्थ आहे.
Saturday, 7 June 2014
कीर्तनकलेचे तीन चरण

Subscribe to:
Posts (Atom)